बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (15:19 IST)

CHIKATGUNDE 2 - ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर

chirkut gunde 2
काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘चिकटगुंडे २’ ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. नुकतेच त्याचे दोन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी ‘चिकटगुंडे २’चा तिसरा एपिसोड येणार आहे. 'पहिल्या सीझनमध्ये ईशान आणि मानव एकमेकांच्या प्रेमात असून ईशानच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचे ‘हे’ नाते ते मान्यही करतात, असे दाखवण्यात आले आहें. आता या भागात ईशान आणि मानवचे नाते नातेवाईकांसमोर येणार असून त्यांच्या प्रतिक्रिया कशा असणार? ईशान आणि मानवला आणखी कोणत्या नवीन आव्हानांना सोमोरे जावे लागणार? हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.  प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत या सीरिजमध्ये  ईशानची भूमिका सुशांत घाडगेने तर मानवची भूमिका चैतन्य शर्माने साकारली आहे.
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोड्सना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना आवडेल, असा उत्तम कॅान्टेन्ट देणे ही भाडिपाची खासियत आहे. मुळात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्ग पाहू शकेल, अशी ही सीरिज आहे. तिसरा भाग आणि येणारे पुढील भागही प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. मागील भागातील सरप्राईज या भागात उघड होणार आहे.’’