शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2017 (21:15 IST)

Fakaat Party - रॅपर गायक श्रेयश जाधव (किंग जेडी) देणार रसिकांना आता ' फकाट पार्टी '

'रॅप' सॉंग म्हंटले तर डोळ्यासमोर एक वेगळाच नजारा उभा राहतो. हनी सिंग, रफ्तार, बादशाह यांच्या रॅपगाण्यातील एट पाहिली असता, तरुणवर्गाला त्यांची भुरळ पडली नाही तर नवलच! पश्चिमात्य देशातून भारतात आलेले हे पॉपसंगीत एका नव्या ढंगात मांडण्याचा प्रयत्न मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधवने केला आहे. विशेष म्हणजे मराठीत सादर झालेल्या या 'रॅप्स'ना देखील लोकांनी चांगलेच पसंत केले आहे. त्यामुळे याच मराठी ढंगात श्रेयश पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यावार्गांना 'फकाट पार्टी' द्यायला येत आहे.

'फकाट पार्टी' या नावातच हे गाणे धम्माल पार्टी सॉंग असल्याचे लक्षात येते. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टीसॉंगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात १०० ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले असून त्यात फाॅरेनर्सचा देखील समावेश आहे.

श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ''रॅप' चे एक वेगळे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. मात्र त्याचे आगामी 'फकाट पार्टी' हे रॅपसॉंग त्याहून अगदी वेगळे आणि पॉपगाण्याशी सलग्न असे असणार आहे. श्रेयश च्या सगळ्याच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅपसॉंगला साजेल असा रुबाब पाहायला मिळतो , हे गाणंदेखील याच धाटणीचे असून मराठीतील या आगळ्यावेगळ्या डिस्को रॅप साँगमध्ये अलिशान गाड्या, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा तरुण निर्माता, रॅप सिंगर व गीतकार म्हणून श्रेयशने आता चांगलाच जम बसवला असून त्याच्या एकामागोमाग एक हिट होत असलेल्या  त्याच्या  रॕपसाँमुळे. श्रेयश हा मराठी पॉप इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती आणतोय असे म्हणायला आता हरकत नाही , रॅप गाण्याचे विविध स्वरूप मांडणारा हा अवलिया त्याच्या आगामी गाण्यात लोकांना काय 'फकाट पार्टी' देतोय, हे लवकरच कळेल.