शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (13:22 IST)

Gautami Patil नाचताना स्टेजवर पडली गौतमी पाटील

Gautami Patil collapsed on the stage डान्सर म्हणजेच गौतमी पाटील ही सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहते. गौतमीचे लाखो चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. त्या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. त्यानंतर गौतमी पुन्हा एदा एका कार्यक्रमात दिसली. मात्र, यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिचा डान्स नाही आहे. तर या कार्यक्रमात गौतमी डान्स करताना पडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे. 
 
गौतमीनं सांगली जिल्ह्यातील तरुण भारत स्टेडियम येथे पार पडलेली दहीहंडी स्पर्धेत हजेरी लावली होती तेव्हा काही वेळातच गौतमीचा डान्स सुरू झाला. यावेळी गौतमी फॅन्टास्टीक या लावणीवर कला सादर करत होती. डान्स सुरू असताना गौतमीने दणक्यात सगळ्यांची मने जिंकली. नाचता नाचता तिचा पाय स्टेजखाली घसरला आणि गौतमी खाली कोसळली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला.