सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (14:04 IST)

Gautami Patil : गौतमी पाटील ने लग्नासाठी घातली ही मुख्य अट

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. हिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ होतो. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे नेहमी चर्चेत असते. एकदा तिला एका चाहत्याने लग्नाची मागणी देखील घातली. यावर तिने प्रतिक्रिया देत लग्नासाठीची मुख्य अट सांगितली. तिने एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबाबत तुला जोडीदार कसा पाहिजे हे विचारल्यावर तिने अरेंज मॅरेज करण्याचे सांगितले आणि सध्यातरी लग्नाचा विचार नसल्याचे सांगितले. 

जोडीदार कसा असला पाहिजे हे सांगताना ती म्हणाली त्याने सर्वकाही एक्सेप्ट केले पाहिजे. मी ज्या फेस मधून निघाले आहे ते पाहून त्याने सर्वकाही मान्य करणारा असावा . अशी प्रतिक्रिया दिली. सध्या लग्नाच्या बाबतीत तिचा काही विचार नसल्याचे ती म्हणाली. 
 
 Edited by - Priya Dixit