शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (17:14 IST)

Maharashtra Shaheer Trailer Out: महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

social media
महाराष्ट्र शाहीर बिग बजेट चित्रपटाचे ट्रेलर काल 11 एप्रिल मंगळवार रोजी राज्याचे  उद्योग मंत्री  उदय  सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत त्यांच्या  बद्दलची माहिती नव्या  पिढीला मिळावी.त्यातूनच पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती समजावी , यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, सर्व शालेय मुलांपर्यंत नेण्याचे काम शासन करेल,अशी घोषणा त्यांनी  केली. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रम झाले या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या सोबत कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे उपस्थित होते. 
 
चित्रपटात उत्तमोत्तम दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांने नटलेला  चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे.
 
शाहिरांनी लोककलेची आणि लोकसंस्कृतीची जोपासना केली आणि लोककला  घराघरात पोहोचली  त्यासाठी मी निर्माते संजय छाब्रिया यांचे आभार मानतो. अशा चित्रपटांच्या मागे शासनाने उभे राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. हे लोकशाहीर पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून शासनातर्फे हा चित्रपट सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यापर्यंत लोककला पोहोचावी याची तजवीज करण्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे.”
‘महाराष्ट्र शाहीर’चे पात्र अंकुश चौधरीने साकारले आहे, यावेळी अंकुश ने सांगितले  “तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एक सर्वांगसुंदर असा चित्रपट तयार करण्यात आला आहे. आपण आणि नव्या पिढीने आवर्जून पाहावा आणि आपल्या मुलांना ही तो दाखवावा, असा हा  चित्रपट आहे. त्यातूनच पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती कळेल, त्यावेळचे विचार, राष्ट्राभिमान, महाराष्ट्राभीमान, मराठीचा अभिमान काय असतो याची जाणीव होईल.28 एप्रिल रोजी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होणार.
 
 
Edited By - Priya Dixit