टीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहेत. चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. अशी पोस्ट नागराज यांनी फेसबुकवर लिहिली. या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.