‘परफ्युम’ चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार
वेगळी प्रेमकथा असलेला ‘परफ्युम’ चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमोल कागणे यांनी ही माहिती दिली. यावेळी नायक ओंकार दीक्षित आणिनायिका मोनालिसा बागल, निर्माते डॉ. हेमंत दीक्षित, अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे उपस्थित होते.
एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या तसेच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.