गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (09:22 IST)

'पार्टी' चे पोस्टर लाँँच

सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या 'पार्टी'चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. धम्माल 'पार्टी'चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला हे मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकार आपल्याला दिसून येतात. 
 
या सिनेमाच्या नावातच 'पार्टी' असल्यामुळे, सहाजणांच्या हटके मैत्रीवर हा सिनेमा आधारित असल्याचा अंदाज येतो. चित्रपटात ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री घेऊन येत  असलेली ही 'पार्टी' खास मैत्रीच्या महिन्यात आयोजित केली असल्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा सिनेमा फ्रेन्डशिप डेची सरप्राईज 'पार्टी'च ठरणार आहे.