शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (17:30 IST)

राणादा पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, या नव्या शो मध्ये दिसणार

Hardik Joshi
झी मराठीवरील मालिका तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक जोशी या अभिनेत्याने राणादाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून हार्दिक प्रेक्षकांच्या घरात आणि मनात पोहोचला. त्या नंतर हार्दिकए अनेक भूमिका साकारल्या पण त्याला राणादा म्हणूनच प्रसिद्धी मिळाली. सध्या हार्दिक स्टार प्रवाह वर प्रसारित होणाऱ्या मालिका तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत अभिनय करत असून शुभंकर नावाचे पात्र साकारत आहे. आता या नंतर हार्दिक पुन्हा एका नव्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो समोर आला आहे. 

नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या रिऍलिटी शो चे प्रोमो जाहीर करण्यात आले असून या कार्यक्रमाचं नाव ;जाऊ बाई गावात ' असे या शो चे नाव आहे. हार्दिक या शो चे सूत्र संचालन करणार आहे. लवकरच या आगळ्या वेगळ्या शो ची सुरुवात झी मराठी वर होणार असून झी मराठीने “करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार’ असं म्हणत शोचा प्रोमो समोर आणला आहे.

काही दिवसांपूर्वी या शोची एक झलक समोर आली होती. या मध्ये शो चे नाव जाहीर केले नव्हते आता शोचे नाव जाहीर करण्यात आले असून हे कार्यक्रम नेमकी कधी येणार हे अद्याप समजू शकले नाही. या शो मध्ये शहरातील आणि गावातील  राहणीमान कशी असते हे जाऊ बाई गावात या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत अजून काय बघायला मिळणार या बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. तसे या शो मध्ये कोणते स्पर्धक दिसणार हे लवकरच समजेल.  
 
Edited by - Priya Dixit