शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (09:37 IST)

संभाजी ब्रिगेडने रोखलं 'मुलगी झाली हो'चं शूटिंग

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण थांबवलं. अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढल्याबद्दल जाब विचारण्यासाठी हे कार्यकर्ते गेले होते. त्यानंतर भुईंज पोलिसांनी 9 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
 
किरण माने बहुजन असल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केल्याचं म्हटलं आहे.
 
'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना हटवल्यापासून वाद सुरू आहे. मालिकेतल्या सहकलाकारांनी किरण माने यांच्याविषयीची मतं व्यक्त केली होती. तर किरण माने यांनी याविषयीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.