गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:57 IST)

धक्कादायक! आणखीन 6 मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 मधील स्पर्धक अभिजीत केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नुकतेच झी युवा वाहिनीवरील सिंंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅहलिटी शोमध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत.
 
सेटवरील दोन क्रू मेंबर्स सुद्धा कोरोनाबाधित आहेत असे समजते आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरपर्यंत या शोचे शूटिंग बंद आहे.