मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (10:39 IST)

'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सोहम आहे फिटनेस ट्रेनर

'अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या मालिकेमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला प्रेक्षकांचा लाडका सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
 
आशुतोषला अभिनयाची आणि फिटनेसची आवड आधीपासूनच होती. अभिनय क्षेत्रात येण्याआधी आशुतोषने दिग्दर्शक केदार शिंदे याना काही काळ असिस्ट केलं. अभिनयाची आवड असल्यामुळे आपोआप आशुतोषच लक्ष फिटनेसकडे गेलं. आधी आशुतोष हा खूप बारीक होता आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात व्यायामाचं वेड आलं. आशुतोष हा नित्यनियमाने व्यायाम करू लागला. गूगलवर सर्च करून आपल्या शरीराची, विविध व्यायामाची व आहाराची अर्धवट अर्धवट माहिती ठेवण्यापेक्षा आपण फिटनेस ट्रेनरचा कोर्स करायला हवा असं आशुतोषला वाटलं आणि म्हणूनच त्याने प्रोफेशनल फिटनेस ट्रेनरचा कोर्स केला. आशुतोष हा नियमितपणे जिममध्ये व्यायाम करतो तसेच त्याच्या डाएटकडे पण त्याचं कटाक्षाने लक्ष असतं आणि म्हणूनच आशुतोष खूप फिट आहे.