बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (15:11 IST)

SARI - हृदयस्पर्शी प्रेमाच्या 'सरी'चे टीझर प्रदर्शित

sari
त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला 'सरी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या( रितिका श्रोत्री)आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार ? हे प्रेक्षकांना येत्या ५ मे रोजी समजणार आहे.
 
कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून 'सरी' या चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. तर या चित्रपटात  रितिका श्रोत्री,अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या प्रमुख भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी दिले आहे.

दिग्दर्शक अशो
का के. एस. म्हणतात, "पहिल्यांदाच मी मराठी कलाकारांसोबत काम करत असून या तरुण कलाकारांचा अभिनय कमाल आहे. चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल सांगायची गरजच नाही, इतके ताकदीचे ते कलाकार आहेत. ही एक प्रेमकथा आहे. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता लवकरच चित्रपटही सिनेमागृहात झळकेल.’’