रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (15:47 IST)

'धप्पा'चा ट्रेलर प्रदर्शित

'तुला माहीत आहे ना बाहेरच जग कसं आहे?' या प्रश्नावर 'बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.' असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावे असे पालकांना वाटते. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा' या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये बघायला मिळते. या ट्रेलरमुळे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, बहुप्रतिक्षित 'धप्पा' बद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. विशबेरी फिल्म्स प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित या चित्रपटाला 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'नर्गिस दत्त' पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 'धप्पा' या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.