सचिन तेंडुलकर व वैज्ञानिक राव यांना 'भारतरत्न' जाहीर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व वैज्ञानिक राव यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी वानखेडेवर सचिनचा भव्य निवृत्ती सोहळा पार पडला. त्याच दिवशी त्याला भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतरत्न मिळणारा सचिन हा पहिलाच खेळाडू आहे.सचिनच्या नावापूर्वी क्रीडा मंत्रालयाकडून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, आज त्यांच्यापूर्वी सचिनला हा पुरस्कार जाहीर करून कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का देण्यात आला आहे.सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणेच त्याच्या चाहत्यांसाठीही एक सरप्राईज गिफ्ट असल्याचं बोललं जात आहे.