शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (13:13 IST)

जेव्हा थेट पंतप्रधान खेळाडूसाठी पाणी घेऊन जातात ........

श्रीलंका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून श्रीलंका विरुद्ध 'पंतप्रधान इलेव्हन' असा टी-२० सराव सामना झाला. याच सामन्यातील १६ व्या षटकानंतर पंचांनी ड्रिंक्सची घोषणा केली. ही घोषणा होताच पंतप्रधान मॉरिसन स्वत: पाण्याच्या बॉटल घेऊन मैदानात धावत आले.

मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मान्यवरांच्या लक्षात ही बाब आली आणि ते काही क्षण अवाक् झाले. मात्र नंतर खेळाडूंनी आपल्या पंतप्रधानांकडून पाणी घेतले आणि त्यांची प्रशंसा करत त्यांचे आभारही मानले.  सोशल मीडियावर पंतप्रधान मॉरिसन यांचं जोरदार कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, हा सामना पंतप्रधानांच्या संघाने जिंकला.