शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 7 मे 2018 (12:20 IST)

माईक हसीने केले कर्णधार धोनीचे कौतुक

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक माईक हसी यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. मंदगती गोलंदाजीवर फलंदाजाला यष्टिचीत करणारा सर्वात चपळ यष्टिरक्षक या शब्दात हसी याने धोनीचे वर्णन केले आहे.
 
धोनी हा भारताचा माजी कसोटी यष्टिरक्षक होता. तेव्हापासून ते आयपीएल स्पर्धेत मी त्याचे यष्टिरक्षण जवळून पाहिले आहे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे फिरकी गोलंदाजांवर सर्वात जलद वेळेत धोनी यष्टीवरील बेल्स उडवितो, असे दिसून आले आहे. तो इतका जलद आहे त्यावर विश्वास बसत नाही, असे ऑस्ट्रेलिाच्या या माजी खेळाडूने सांगितले.
 
चेन्नईने बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केल्यानंतर हसी हे बोलत होते. या सामन्यात धोनीने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ए.बी. डी'व्हिलिअर्स, मुरुगन अश्विन या दोघांना हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर कधी यष्टिचीत केले, हे कळून आले नाही, असे ते म्हणाले.
 
त्याच्या या कमगिरीमुळे चेन्नईने बंगळुरुला कमी धावसंख्येत रोखले, अशी भरही त्याने घातली.