डिव्हिलियर्सची कसोटीतून विश्रांती
दक्षिण आफ्रिकेची वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या प्रतिष्ठेच्या विजेतेपदाची प्रतीक्षा इतकी वाढत चालली की, त्यांच्या वन डे संघाचा कर्णधारा एबी डिव्हिलियर्सने विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटी क्रिकेटमदून विश्रांतीचा निर्णय घेतला अहे. 2019 साली इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक हेच आपल्या उर्वरित कारकिर्दीचे मुख्य लक्ष्य असल्याचे त्याने जानेवारीत स्पष्ट केले. 2019 सालच्या विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यासाठी उत्सुक असेल. दक्षिण आफ्रिकेने 1998 साली आयसीसी नॉकआऊट स्पर्धेची विजेतेपद पटकावले होते.