सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)

निवडसमितीचे अनेक सदस्य तर अनुष्काला चहा द्यायचे, हेच तर त्यांचे काम

भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीवर जबरदस्त टीका केली आहे. प्रसाद आणि त्यांचे सहकारी म्हणजे Mickey Mouse Selection Committee आहे. हे सर्व लोकं फक्त अनुष्का शर्माच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये धन्यता मानत आहेत. 
 
भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या पुणे येथील क्रिकेट अकादमीला इंजिनीअर यांनी भेट दिली. यावेळी एका इंग्रजी वृतपत्र टाइम्स ऑफ इंडिया कडे आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की अभिनेत्री अनुष्का शर्माला कपातून चहा देण्याऐवजी यांनी दुसरे काहीच काम केले नाही.
 
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत असंच चित्र दिसत होते. आता  मला हेच कळत नाही, की लोकं निवड समितीवर निवडून येण्यासाठी पात्र कशी ठरली? यांच्यापैकी किती लोकांनी किमान १०-१२ कसोटी सामने खेळले आहेत? त्यांच्यापैकी एकाला तर मी ओळखतही नव्हतो. विश्वचषकादरम्यान हा माणूस कोण आहे? असं विचारल्यावर मला तो निवड समितीचा सदस्य असल्याचं कळलं.” इंजिनीअर यांनी आपलं परखड मत मांडलं.या मुळे भारतीय क्रिकेट विश्वात मोठा वाद सुरु झाला आहे.