मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (14:39 IST)

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाचा 6 गडी राखून पराभव केला

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 18व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाचा 6गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील हा सलग पाचवा विजय आहे, तर भारताचा या स्पर्धेतील हा तिसरा पराभव आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मिताली, हरमनप्रीत आणि यास्तिकाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार मेग लेनिंगच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सवर 280 धावा करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन कर्णधार लेनिंग वैयक्तिक 97 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. या विजयासह ऑस्ट्रेलिया सध्या सुरू असलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करणारा पहिला संघ ठरला आहे.