IND W vs UAE W : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा युएईशी सामना
भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी ग्रुप स्टेजमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) चे सामना करत उपांत्यफेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्नात असणार.
दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या डावखुरा फिरकीपटू राधा यादवकडूनही संघ व्यवस्थापनाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी 9.3 षटकात 85 धावांची भागीदारी केली. यानंतर भारताने झटपट तीन विकेट गमावल्या. यूएईविरुद्धच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल
भारत आणि UAE महिला संघांमधील आशिया कप गटातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल.
सामन्यासाठी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
भारत: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकार, राधा यादव, रेणुका सिंह.
UAE: रिनिता राजीथ, लावण्य केनी, ईशा ओजा (कर्णधार), खुशी शर्मा, कविशा अगोदरगे, हीना होटचंदानी, तीर्था सतीश (wk), समायरा धरणीधारका, रितीका राजित, इंदुजा नंदकुमार, वैष्णवी महेश.
Edited by - Priya Dixit