मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:16 IST)

इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅच : भारताचे सीरिजमध्ये २-१ असे कमबॅक

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१७ रनवर ऑल आऊट झाला यामुळे भारताचा तब्बल २०३ रननी विजय झाला आहे. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडनं ३११-९ अशी केली होती. पण पाचव्या दिवसाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये अश्विननं अंडरसनला आऊट केलं आणि भारतानं सामना खिशात टाकला. इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला होता. आता तिसरी टेस्ट जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-१ असं कमबॅक केलं आहे. इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट मॅच ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 
 
इंग्लंडला ५२१ रनचं आव्हान ठेवल्यानंतर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला २ आणि मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि अश्विनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.