रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

माझ्या यशाचे श्रेय सहकार्‍यांनाच- विराट

पुणे- मी कोणी महान कर्णधार नाही. सुदैवाने मला कर्णधारपदी जबाबदारी स्वीकारताना उत्तम सहकारी लाभले आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे मी यशस्वी कर्णधार झालो आहे, असे विराट कोहलीने सांगितले.

संघातील सहकार्‍यांकडून अपेक्षेइतकी कामगिरी होत नसेल तरच कर्णधारावर टांगती तलवार राहते, माझ्याबाबत असे घडलेले नाही. आमच्या संघातली प्रत्येक खेळाडू वैयक्तिकरित्या सर्वोत्तम का‍मगिरी करीत असतो व ही कामगिरी करताना तो सांधिक कौशल्यातही तितकाच महत्त्वाचा वाटा उचलत असतो. न्यूझीलंड व इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघांविरूद्ध आम्हाला कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवता आले.