रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (16:44 IST)

IPL 2021, SRH vs RR: संजू सॅमसन ने IPL मध्ये 3000 धावा पूर्ण करून ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली

फोटो साभार ट्विटर 
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. या अर्धशतकासह संजूने आयपीएलमध्ये आपल्या 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा संजू 19 वा फलंदाज बनला आहे. IPL मध्ये त्याच्या  सर्वोच्च धावसंख्या 119 धावा आहे. संजूने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात तीन शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. 
 
संजूच्या आता 117 आयपीएल सामन्यांमध्ये 3017 धावा आहेत. त्याने सोमवारी हैदराबादविरुद्ध 57 चेंडूत 82 धावांची अद्भुत खेळी खेळली. त्याच्या डावात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने आयपीएल 2019 मध्ये 342 धावा आणि 2020 मध्ये 375 धावा केल्या. त्याने आता या मोसमात 10 सामन्यांत 433 धावा केल्या आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनकडून ऑरेंज कॅपही जिंकली आहे. सॅमसनने या हंगामात आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत.