शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गांगुलीला केले ट्रोल!

नेहमीच आपल्या ट्विटसने सर्वांना ट्रोल करणार्‍या विरेंद्र सेहवागने यावेळी सौरव गांगुलीची दांडी उडवली आहे. सेहवागने आपल्या ट्विटच्या माध्यामातून सौरवला ट्रोल केले आहे. 
 
दोन पांडांचा फोटो ट्विट करत विरूने दादा गांगुलीच्या सिक्सर लगावण्याच्या शैलीला लोकांसमोर ठेवले आहे. सेहवागने दोन पांडांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. यात दादा गांगुली आणि चायनीज गांगुली असा उल्लेख करत सेहवनागने गांगुलीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
सहवागने ट्विट केलेल्या पांडांच्या फोटोतील एका पांडाचे डोळे मोठे आहेत, त्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळेही आहेत, जी एखाद्या चष्म्यासारखी दिसत आहेत. तर दुसर्‍या पांडाचे डोळे लहान आहेत. या पांडाचे उदाहरण देत सेहवागने गांगुलीसोबत घालवलेल्या आठवणींना ट्विटमधून उजाळा दिला आहे.