बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (12:05 IST)

ऑस्ट्रेलिाविरुध्द मिताली करणारभारताचे नेतृत्व

सलामीची फलंदाज मिताली राज ही ऑस्ट्रेलियाविरुध्द वडोदरा येथे 12 ते 18 मार्च दरम्यान होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताच्या 15 सदस्यीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे.
 
बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले की, अखिल भारतीय महिला निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुध्द होणार्‍या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारताच्या महिला संघाची निवड केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यत्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना 12 मार्च रोजी तर पुढील दोन सामने 15 आणि 18 मार्च रोजी खेळले जाणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय त्रिकोणी मालिका खेळली जाईल. त्यासाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल.
 
भारती संघ : मिताली राज (कर्णधार), हरनप्रित कौर, स्मृती मानधना, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीग्ज, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, सुषमा वर्मा, एकता बिस्त, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, सुकन्या परिदा, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा.