शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2017 (12:54 IST)

नागपूर : वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. नागपुरातील उच्चभ्रु शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी उमेशच्या घरातून सुमारे 45 हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन लंपास केला. चोरी झाली  त्यावेळी उमेश यादव कुटुंबासोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आले.  यानंतर उमेद यादवने पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.