सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 14 मे 2018 (14:12 IST)

सेहवागबरोबर वाद झालाच नाही : झिंटा

अभिनेत्री व पंजाब टी-20 संघाची सहमालकीण प्रीती झिंटा हिने सेहवागबरोबर शाब्दिक वादविवाद झाला नाही, असे सांगितले. राजस्थानविरूध्दच्या आयपीएल सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रीती झिंटाने प्रशिक्षक वीरेंदर सेहवागला जाब विचारला, असे वृत्त आले होते. हे वृत्त खोटे असल्याचे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने स्पष्ट केले आहे. झिंटा व सेहवाग यांच्यात वाद झाला होता. झिंटाचे वागणे सेहवागला पटले नाही, असेही वृत्त आले होते. परंतु असा कोणताही प्रकार घडला नाही, असा खुलासा पंजाब संघाने केला आहे.