रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

पुण्याची खेळपट्टी सुमार दर्चाजी, पंचांकडून ताशेरे

पुणे- कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची पुणे कसोटी तब्बल 333 धावांनी गमावली. कंगारूंनी कोहली ब्रिगेडला अवघ्या तीनच दिवसात गुंडाळले. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर अवघ्या तीन दिवसात 40 विकेट्स पडल्या.
 
भारतीय संघाचा हा आजवरचा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला. भारतीय चाहत्यांनी यावेळी संघातील खेळाडंच्या निराशाजनक कामगिरीसोबतच खेळपट्टीवर देखील टीका केली होती. अखेर या सामन्याचे पंच ख्रिस ब्रॉड यांनीही पुण्याच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत.
 
ब्रॉड यांनी सामना झाल्यानंतर खेळपट्टीचे परिक्षण केले व त्याचा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाठवला आहे.