रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कोणालाही कमी लेखू नका: सचिन

मुंबई- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेत वर्चस्व गाठण्याची क्षमता आपल्या संघात आहेच, त्याबाबत कोणालाही शंका नाही, पण कांगारूंना कमी लेखण्याची चूक करू नये, असा सल्ला सचिन तेंडुलकरने विराटसेनेला दिला आहे.
 
क्रीडा साहित्य तयार करणार्‍या स्पार्तन या कंपनीच्या कार्यक्रमात सचिन बोलत होता. ऑस्ट्रेलिया हा ताकदवर संघ आहे, पण भारतात भारताविरूद्ध खेळणे सोपे नाही, याची जाणीव त्यांना आहे. हेच भारतीय संघ सध्या करत असलेल्या प्रगतीला मिळणारी दाद आहे, पण आपली क्षमता कितीही मोठी असली तरी प्रतिस्पर्ध्यांना गृहीत धरू नये, असे सचिनने सांगितले. ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणे सोपे नसते, मात्र विराटसेनेवर माझा विश्वास आहे.