रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

साक्षीचा धोनीला खास संदेश!

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाल्याची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडीयावर त्याने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यास सुरूवात केली. त्याची पत्नी साक्षी धोनी हिने देखील आपल्या ट्विटर अकाउंटवर धोनीसाठी एका खास संदेश ट्विट केला.
 
जगातील असे कोणतंच शिखर नाही, की जे पादाक्रांत करण्यास तुला कुणी अडवू शकेल, मला तुझा अभिमान आहे, असे ट्विट साक्षीने केले. धोनीशी विवाह झाल्यानंतर साक्षी प्रत्येक क्षणी धोनीच्या पाठिशी उभी राहिली आहे. धोनीच्या बहुतेक सामन्यांना ती उपस्थित राहून त्याचा आत्मविश्वास वाढवताना देखील दिसून आली होती.
 
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी सर्वात प्रथम आपल्या ट्विट अकाउंटवरून धोनी कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले होते. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात जोहरी म्हणाले की, भारतीय संघाच्या वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याची इच्छा धोनीने बीसीसीआयला पत्राद्वारे कळवले.
 
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी तो उपलब्ध असणा आहे. पण तो कर्णधार म्हणून यापुढे कामगिरी सांभळणार नाही. धोनीचा हा निर्णय निवड समितीलादेखील कळविण्यात आला आहे.