शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क स्टारला मिळाले

मुंबई- आयपीएलच्या गेल्या दहा मोसमांचे हक्क मिळवून स्वत:चे वर्चस्व निर्माण करणार्‍या सोनी पिक्चर्सची मक्तेदारी अखेर स्टार इंडियाने मोडीत काढली आहे. स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत आयपीएल समान्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळविले आहेत.
 
स्टारने 16,347.50 कोटींची बोली लावून हे हक्क मिळविले असून त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी स्टारकडे आयपीएलच्या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क राहणार आहेत.