सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (13:35 IST)

T20 World Cup: भारताला आणखी एक झटका, हा खेळाडू T20 वर्ल्डकपमधून बाहेर !

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज दीपक चहर बाद झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहर या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली. चहरच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूरची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला किंवा मोहम्मद शमीला मुख्य संघात घेण्याची चर्चा होती. आता चहर दुखापतीमुळे या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली.
 
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ:
भारत:  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , अर्शदीप सिंग.
 
स्टँडबाय खेळाडू:  मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर (चाहरचे नाव अद्याप अधिकृतपणे काढलेले नाही).
 
Edited By - Priya Dixit