गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (14:05 IST)

VIDEO गळ्यात रुद्राक्ष माळ घालून विराट कोहली आणि साडीत अनुष्का शर्मा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची धर्माप्रती श्रद्धा पाहायला मिळत आहे. यावेळी दोघांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात पूजा केली. विराट आणि अनुष्का इतर भक्तांसोबत महाकालच्या दारात मोठ्या भक्तिभावाने बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघांचेही कपडे पारंपारिक आहेत. विराटने धोतर घातले आहे आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे तर अनुष्काने साडी घातली आहे.
 
विराट कोहली टेस्ट मॅच खेळण्यासाठी इंदूरला पोहोचला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) अंतिम फेरीत पोहोचला आहे. या कसोटी मालिकेत विराटची बॅट आतापर्यंत कोणतीही खास कामगिरी करू शकलेली नाही. 
 
यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये विराट- अनुष्का ने ऋषिकेशचा धार्मिक प्रवास केला होता. त्यांनी स्वामी दयानंद गिरि आश्रम गाठले होते. ते दोघे वृंदावन येथील एका आश्रमात प्रवचन ऐकताना देखील दिसले होते आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला होता. व्हिडिओमध्ये मुलगी वामिकाही तिची आई अनुष्का शर्माच्या मांडीवर बसलेली दिसली. व्हिडिओमध्ये हे जोडपे हात जोडून बसून संत परमानंद महाराजांचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसत होते.