सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (17:43 IST)

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराट करणार मोठा खुलासा

भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधी विराट कोहलीला अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. (India Tour Of South Africa) प्रत्येकाला विराटकडून जाणून घ्यायचे आहे की त्याला वनडे कर्णधारपदी राहायचे होते की नाही? टी२० कर्णधारपद सोडताना विराटने वनडे आणि कसोटी कर्णधारपदी आपण कायम राहणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, अचानक निवडकर्त्यांनी त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटविले. अशा परिस्थितीत विराटची प्रतिक्रिया जाणून घ्यायला सर्वांना आवडेल. विराटसाठी दुसरा मोठा प्रश्न असेल की त्याला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी निवडकर्त्यांनी त्याच्याशी चर्चा केली की नाही? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडल्यानंतर निवडकर्त्यांनी विराटच्या अनुपस्थितीत आणखी एक बैठक घेतली‌. ज्यामध्ये त्याला वनडे कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला.

विराटसाठी या पत्रकार परिषदेत तिसरा मोठा प्रश्न असेल की, त्याचे रोहित शर्माशी काही मतभेद आहेत का? विराट वनडे कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरच रोहित शर्माला अचानक दुखापत झाली आणि तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. चाहत्यांच्या मनात शंका आहे, त्यामुळे विराट कोहलीला या मुद्द्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच या दौऱ्यावरील वनडे मालिकेतून माघार घेतल्याविषयीही विराटला प्रश्न विचारले जातील