जोडप्याच्या शरीरावर 'रेकॉर्ड ब्रेक टॅटू'
मेलबर्न ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी एका वृद्ध जोडप्याने अंगभर टॅटू काढून गिनीज बुकात नोंद केली आहे.
अंगावर वेगवेगळ्या चित्रांचे टॅटू शाल्र्स हेल्मके (चुंक) या 75 वर्षीय वृद्धाने काढले आहे. त्यात मानवी कवटीचाही समावेश आहे. त्याच्या शरीराचा 93.75 टक्के भाग टॅटूने व्यापला आहे. तर शालरेट गुट्टेंबर्ग (वय-67) हिनेही आपले शरीर 91.5 टक्क इतके टॅटूने व्यापले आहे.
चुंक हा अमेरिकेच्या सैन्यात होता. त्याने 1959 मध्ये पहिल्यांदा शरीरावर टॅटू काढला. तर हळूहळू त्याने शरीरभर टॅटू काढले. चुंक आणि शलरेट यांची 2006 मध्ये भेट झाली. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि 2007 पासून ते एकत्र राहू लागले. या जोडप्यानी आपले शरीर टॅटूने रंगविले आहे. गिनीज बुकात नोंद झाल्याने आनंदी असल्याचे ते सांगतात.