आता लावा ही सवय
कोरोनामुळे आपल्याला सतत हात धुण्याची सवय लागली आहे. बाहेरून आल्यावर किंवा कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर आपण हात धुतो. त्याचप्रमाणे पासवर्ड बदलण्याची सवय लावून घ्या. ई-मेल अकाउंट असो किंवा पेमेंट बँक, मोबाइल वॉलेट, ऑनलाइन बँक अकाउंट या सगळ्यांचे पासवर्ड सतत बदलत राहायला हवं. यामुळे तुमची सगळी खाती सुरक्षित राहतील.
हॅकिंग किंवा सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आता पासवर्ड बदलण्याची सवय लावून घ्या. सध्या ऑनलाइन पर्यायांचा अधिक वापर होत असल्यामुळे हॅकर्सही सज्ज झाले आहेत. म्हणूनच कोणता पासवर्ड ठेवायचा याचाही विचार करत राहा.
प्राजक्ता जोरी