'नासा' शोधणार गुरुच्या चंद्रावर जीवन
अमेरिकेची अंतराल संस्था नासा गुरुचा चंद्र असलेल्या युरोपावर रोबोटिक लँडर पाठविण्याची योजना आखत असून युरोप हा पूर्णपणे बर्फाच्छादित असून, येथे जीवन शोघण्याचा नासाचा प्रयत्न असणार आहे. २0१६ मध्ये युरोपावरील लँण्डर मोहिमेच्या वैज्ञानिक मूल्यांचे आणि अभियांत्रिकी रचनेची भविष्यातील मूल्यमापन नासाची प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन ही संस्था करत होती. नासातर्फे वेळोवेली अभ्यास केला जातो, या संस्थेच्या अहवालांना विचारात घेउनच कोणतीही मोहीम आखली जाते. संस्थेकडून या मोहिमेसाठी आलेल्या अहवालातून नासाने तीन वैज्ञानिक ध्येये ठरवली आहेत.
त्यामध्ये युरोपावर जीवन शोघणे याला मात्र प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर तेथील वातावरण आणि
पृष्ठभागाची रचना व स्थिती याचा ही अभ्यास केला जाणार आहे. तसेच पृष्ठभागाच्या स्थितीनुसार पुढील हिमेसाठी लागणार्या नोंदी आणि येथील गोठलेल्या जमिनीखालील समुद्राचाही अभ्यास केला जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना नासाने येथील दुर्मीळ परिस्थितीचा विचार करता सद्यस्थितीला पृथ्वी
सोडून जीवन शेधण्यासाठी युरोपाला सर्वोच्च प्राधान्य असेल असे म्हटले आहे.