Online etiquette : वर्क फ्रॉम होम करताना या गोष्टीचे पालन करा

work from home
Last Modified शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (15:34 IST)
आजकाल लॉकडाउनमुळे संपूर्ण जगाने घरातूनच काम करणे स्वीकारले आहे. तसेच भारतातील सर्व खाजगी कंपन्याही घरातूनच काम करीत आहे. या साठी दररोज इंटरनेटचा वापर केला जात आहे. यामध्ये ऑनलाईन बैठका देखील घेतल्या जात आहे.

व्हाट्सअॅप, स्काइप, व अन्य व्हिडिओ कॉल देखील वापरले जात आहे. ऑनलाईन साहित्यांचा वापर आपले बॉससह इतर सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उपयोगात येत आहे. अश्या परिस्थितीत ऑनलाइनचा वापर सौजन्याने करणे महत्त्वाचे आहे.

काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
1 ऑनलाईन काम करताना किंवा मीटिंग करताना आपण जसे ऑफिसमध्ये स्वतःला सादर करता तसेच स्वतःला सादर करा. आपण जिथे बसता आणि काम करता तिथले वातावरण व्यावसायिक असले पाहिजे.
2 आपल्या अवती भवती स्वच्छता असावी. कुठलाही पसारा नसावा.
3
व्हिडियो कॉल मध्ये नीट नेटके आणि मीटिंग साठी सज्ज दिसायला हवे.
4 मीटिंग करताना मुद्यांची नोंद करण्यासाठी पेन आणि डायरी घेऊन बसा.
5 कॉल मध्ये इतर सहकाऱ्यांशी बोलताना व्यत्यय आणू नये.
6 कॉल चालू असताना कोणतेही अन्य अनुप्रयोग उघडू नये किंवा कुठलाही प्रकाराचे आवाज करू नये.
7 ऑनलाईन बैठकीत असताना आपल्या घरातील सदस्यांचा आवाज किंवा टीव्हीचा आवाज येणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
8 जिथे बसत आहात ती जागा नीट नेटकी स्वच्छ असावी.

त्याशिवाय इंटरनेट वापरताना ही खबरदारी घ्या -
1 प्रक्षोभक किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या ऑनलाईन पोस्ट करणे टाळावे.
2 कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सामायिक न करता इतरांच्या गोपनीयतेचा आदर राखावा.
3 कधीही अनावश्यक ईमेल पाठवून इतरांना स्पॅम करू नका.
4 लोकांना वारंवार त्रास देऊन किंवा छळ करून वेब मंचावर किंवा वेबसाइटच्या टिप्पण्यांमध्ये ट्रोल करू नका.
5 कोणत्याही ईमेल किंवा पोस्ट मध्ये मोठी अक्षरे (केपीटल लेटर) वापरणे टाळावे. काही लोकांना असे वाटते की संपूर्ण संदेशासाठी कॅप्सलॉक बटणं ठेवले तर वाचायला सोपे जाईल पण प्रत्यक्षात त्याउलट असत. हे वाचायला तर कठीण आहेच वर एक आक्रोश होतो. जे फार कठीण असतं.
6 ऑनलाईन मंचावर पोस्ट करताना किंवा फोटो किंवा कुठल्याही व्हिडिओ वर टिप्पणी देत असल्यास यूट्यूब किंवा फेसबुक टिप्पण्या सारख्या विषयांवर चिकटून राहा.
7 इंटरनेटवर चुकीची भाषा वापरू नये.
8 अधिक नकारात्मक टिप्पण्यांसह नकारात्मक उत्तर देणे टाळावे. त्या ऐवजी सकारात्मक पोस्टासह नकारात्मक पोस्टाचे चक्राला खण्डीत करा.
9 कोणी काही प्रश्न विचारले असतील आणि त्याचे उत्तर आपणास माहिती असेल तर त्याला मदत करा.
10 ईमेल पाठवताना, विषय क्षेत्र जरूर वापरा जेणे करून ईमेल प्राप्त कर्त्यास ईमेल लवकर ओळखण्यात मदत होईल.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

गावस्कर कमेंट- शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलव्हर केले, ते ...

गावस्कर कमेंट- शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलव्हर केले, ते कधी करणार; चाहत्यांनी कमेंट काढण्याची मागणी केली
माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल समालोचक सुनील गावसकर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात ...

आरोपपत्रात खुलासा - दाऊदची बहीण आणि मलिक यांच्यात अनेक ...

आरोपपत्रात खुलासा - दाऊदची बहीण आणि मलिक यांच्यात अनेक भेटी, हिसकावली कोटींची मालमत्ता
अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद' इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी ...

Redmi Note 11T Pro + स्मार्टफोन 24 मे रोजी होणाल लॉन्च, ...

Redmi Note 11T Pro + स्मार्टफोन 24 मे रोजी होणाल लॉन्च, प्री-रिझर्व्ह बुकिंग सुरू
. Redmi त्याच्या T सीरीजमध्ये Redmi Note 11T Pro आणि Redmi Note 11T Pro + स्मार्टफोन सादर ...

Gold Silver Rate Today: सोने-चांदी वधारले, खरेदी ...

Gold Silver Rate Today: सोने-चांदी  वधारले, खरेदी करण्यापूर्वी दर तपासा
गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानतात. देशातील सोने व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या ...

मराठी नृत्यांगना वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल, लाल महालात ...

मराठी नृत्यांगना वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल, लाल महालात लावणीचा व्हिडिओ शूट करण्यात आला
पुणे पोलिसांनी मराठी नृत्यांगना वैष्णवी पाटील आणि इतर २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...