सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (14:56 IST)

स्टाफ सिलेक्शन परीक्षांच्या नवीन तारखा 3 मेनंतर

कोरोनामुळे कर्मचारी निवड आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन कमिशन) परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय 3 मे, 2020 नंतर म्हणजेच लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेण्यात येणार   आहे, अशी माहिती आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर देण्यात आली आहे. तसेच आयोगाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदस्य त्यांचा एक दिवसाचा पगार पंतप्रधान नागरिक सहायता आणि मदत निधीला (पीएफ केअर्स फंड) देतील, असे ठरविण्यात आले.

या परीक्षांच्या तारखांचे केलेले नियोजन आयोगाच्या वेबसाइटवर आणि आयोगाच्या प्रादेशिक / उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिसूचित केले जाईल. आयोगाने अधिसूचित केलेल्या परीक्षांच्या वार्षिक वेळापत्रकाच्या बरोबरच अन्य परीक्षांच्या वेळापत्रासंदर्भातही आढावा घेतला जाईल.