शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (14:27 IST)

नृत्यामध्ये स्वप्नीलची यशस्वी भरारी

स्वप्निल चिंचोलिकार, हा पुण्यात राहणार एक होतकरू तरुण असून त्याच्या नृत्याच्या प्रवासाची सुरुवात २०१० मध्ये  केली. अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेल्या स्वप्नीलला नृत्याची प्रचंड आवड होती, त्याला नृत्यामध्येच करिअर करायचं होत, पण मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारे आई-वडील नृत्याच्या विरोधात होते. त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करून घर खर्चाला हातभार लावावा अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्याचे वडील पीएमसी येथे सिव्हिल ड्राफ्ट्स मॅन आहेत आणि आई गृहिणी आहे. एवढं सगळं असतानाही त्याने त्याच्या अभ्यासासह नियमित नृत्य क्लासला सुरुवात केली.
 
कालांतराने, त्याचे नृत्या विषयी प्रेम वाढत गेले आणि नृत्यामध्ये करिअर करण्यासाठी खूप मेहनत केली. त्यांच्या मेहनत आणि प्रतिभेमुळे, त्याला विशेष संभाव्य बॅचमध्ये निवडले गेले. नृत्यविषयी शिकत असताना, श्यामक अकादमीच्या तज्ज्ञांनी त्याला नृत्या मधील कौशल्य वाढविण्यासाठी विशेष व्यावसायिक एक वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली.
स्वप्नील त्यानंतर शामक दावर डान्स कंपनीचा एक भाग म्हणून त्याची निवड करण्यात आली. शो, इव्हेंट्स, पुरस्कार आणि प्रॉडक्शनमध्ये भारत आणि परदेशात काम करण्यास गेला. तो ह्या शाखेचा भाग म्हणून देशभर भ्रमंती केली आहे. त्याने अर्धवार्षिक कार्यक्रमास सहकार्य केले आणि सध्या तो ओवायपीचा सहाय्यक व्यवस्थापक आहेत. स्वप्निलच्या व्यवस्थापकीय कौशल्य आणि जबाबदारीची चांगल्या प्रकारे मिळवली आणि यातून त्याला शिकायला आणि कमविण्यास फायदा झाला आहे.
 
जेव्हा स्टेजवर नृत्य करताना त्यांच्या पालकांनी त्याच्यातील कला पाहिली तेव्हा त्यांनी त्यांची धारणा बदलली आणि श्यामक दावर अकादमीच्या व्यावसायिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास पाठिंबा दिला. कार्यक्रमाच्या अखेरीस, वन इयर प्रोग्राम बॅचच्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन शो सादर केला होता- सेल्कोउथ, हा शो आज देशातील उत्कृष्ट कंटेंपररी नृत्य निर्मितींपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर श्यामक दावर डान्स कंपनीचा एक भाग म्हणून त्यांची निवड झाली. याद्वारे त्याने भारतात, परदेशात शो, इव्हेंट्स, पुरस्कार आणि प्रोडक्शन करिता नृत्य करण्याची संधी मिळाली. या ओआयपी'चा एक सदस्य म्हणून देशभर प्रवास केला.
 
त्यांनी अर्धवार्षिक कार्यक्रमास सहाय्य केले आणि सध्या तो ओवायपीचा सहाय्यक व्यवस्थापक आहेत. स्वप्नीलची व्यवस्थापकीय कौशल्ये आणि जबाबदारीची भावना यामुळे त्याला प्रशासकीय भूमिका मिळाली, ज्यामुळे त्याच्या कामासोबत कमाईही वाढत गेली.
ओवायपीने त्याला भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखांना बळ दिले. स्वप्नील म्हणतो कि, "मला या कार्यक्रमाद्वारे मी कोण आहे याचे उत्तर मला मिळाले आहे, हे मला माझ्या जवळ घेऊन आले. मी माझ्या  आयुष्याकडे बघितल्यास लक्षात येते कि, यामुळे मला अधिक शिस्तबद्ध जीवनशैली प्राप्त करण्यास मदत केली. शामक आरोग्यापासून ते प्रवास पर्यंत सर्वांची काळजी घेतो. आणि बरच काही. हेच एकमात्र ठिकाण आहे जिथे आपण ह्या शाखेच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नृत्य शिकू शकता. याच कार्यक्रमासाठी एक विद्यार्थी ते सहाय्यक व्यवस्थापक ही भूमिका मिळवण्यापर्यंतचा प्रवास सुंदर आहे आणि मला खात्री आहे की या पुढे हि अधिक सुंदर होईल.