शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:50 IST)

सरकारी नोकरी : NHPC मध्ये भरती 1 फेब्रुवारी 2021पर्यंत अर्ज करा

एनएचपीसी भरती 2021: एनएचपीसी लिमिटेड (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) मध्ये अनेक पदांवर भरती काढण्यात आल्या आहेत.हे रिक्त पद ट्रेंड अप्रेंटिसच्या पदासाठी आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 1 फेब्रुवारी 2021पर्यंत अर्ज  करू शकतात. या पदांशी निगडित सर्व माहिती जसे की आवश्यक पात्रता,निवड प्रक्रिया,अर्ज कसा करावा,पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
 
पदांचा तपशील- 
ट्रेंड अप्रेन्टिस - एकूण 51 पदे
 
अर्ज करण्याची अंतिम तिथी -  01 फेब्रुवारी 2021 
 
वयो मर्यादा- 
या पदांसाठी  उमेदवारांचे किमान वय  18 वर्षे आणि कमाल वय वर्ष 30 निश्चित करण्यात आले आहे.
 
निवड प्रक्रिया -   
उमेदवारांची निवड योग्यतेच्या आधारे केली जाईल.
 
शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने  किमान 10 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तपशीलवार अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.
 
अर्ज प्रक्रिया- अर्ज फॉर्म डाउनलोड करून भरून अंतिम तिथीच्या  पूर्वी निर्दिष्ट पत्त्यावर पाठवा.
पत्ता-   Deputy General Manager (Human Resources),Parbati-III Power Station,Village-Bihali, Post Office Larji,District Kullu, Himachal Pradesh, pincode – 175122 
 
अर्ज फी- 
उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही.
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे  http://www.nhpcindia.com/
क्लिक करा.
 
अधिसूचना आणि अर्ज फॉर्म साठी येथे  http://www.nhpcindia.com/writereaddata/Images/pdf/Apprentices%20at%20Parbati-III-Advertisement.pdf क्लिक करा.