1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:17 IST)

RBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा

बँकेत  नोकरी  करु  इच्छित  असणार्‍यांसाठी  एक सुवर्णसंधी चालून  आली  आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने  ग्रेड-बी ऑफिसर या पदाच्या शेकडो रिक्त जागांवर भरती सुरू केली आहे.
 
जाणून  घ्या  सविस्तर  माहिती- 
या पदांसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक असे उमेदवार पात्र असतील.
 
पदांचा तपशील
पदांची एकूण संख्या - ३२२
ऑफिसर ग्रेड बी (General) - २७० पदे
ऑफिसर ग्रेड बी (DEPR) - २९ पदे
ऑफिसर ग्रेड बी (DSIM) - २३ पदे
 
शिक्षण 
RBI ऑफिसर Grade B (जनरल) साठी कोणत्याही विषयात किमान ६० टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 
एससी, एसटी दिव्यांगांसाठी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा कोणत्याही विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन केले असणे आवश्यक.
ऑफिसर Grade B (डीआयपीआर आणि डीएसआयएम) साठी - संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. 
 
अधिक माहितीसाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा.
 
या प्रकारे  करा अर्ज
रिझर्व्ह बँकेच्या या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज २८ जानेवारीपासून ते १५ फेब्रुवारी दरम्यान  करता  येऊ  शकतं.