शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (15:39 IST)

रेल्वेत निघाली नोकरभरती, शैक्षणिक पात्रता दहावी पास

रेल्वेत नोकरभरती निघाली आहे. या जागांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे. इतकेच नाही तर सर्व जागा या महाराष्ट्रात आहेत. रेल्वेने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकता. रेल्वेत २ हजार ४२२ जागांसाठी नोकरभरती निघाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची तारीख ही १६ फेब्रुवारी आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
 
पुणे, भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूरमध्ये ही नोकरभरती आहे. १६ फेब्रुवारी रोजी अर्ज करण्याची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी दहावी असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराला दहावीत कमीत कमी ५० टाक्के गुण असावी अशी अट आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरीटवर होणार आहे.
 
सध्या रेल्वेमध्ये २ लाख ६५ हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली होती. सध्या रेल्वेमध्ये २ लाख ६५ हजार ५४७ पद रिक्त आहेत. त्यात २ हजार १७७ जागा आहेत. या गॅजेटेड आणि २ लाख ६३ हजार ३७० जागा नॉन गॅजेटेड आहे. ही पदं भरण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नोकरभरती करणार आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेत एकूण २ लाख ६५ हजार ५४७ जागा रिक्त आहेत. त्यातील गॅजेट पदावरील मध्य रेल्वेत ५६, ईस्ट कोस्ट रेल्वेत ८७, इस्टर्न रेल्वेत १९५, ईस्ट सेंट्रल रेल्वेत १७०, मेट्रो रेल्वेत२२, नॉर्थ सेंट्र रेल्वेत १४१, नॉर्थ इस्टरन रेल्वेत ६२, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेत ११२, नॉर्दन रेल्वेत, १५, नॉर्थ वेस्टर्न रेल्वेत १००, साऊथ सेंट्रल रेल्वेत ४३, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेत ८८, साऊथ इस्टरन रेल्वेत १३७, साऊदर्न रेल्वेत ६५, वेस्ट सेंट्र रेल्वेत ५९, वेस्टर्न रेल्वेत १७२ आणि इतर ठिकाणी ५०७ जागा रिक्त आहेत.