रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:19 IST)

UPPSC Recruitment 2021 वेगवेगळ्या विभागांसाठी 972 पदांवर भरती, या प्रकारे करा अर्ज

सरकारी नोकरीत चांगल्या पोस्टची वाट बघत असणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे की उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाकडून चिकित्सा शिक्षा विभागासह अनेक इतर सरकारी विभागांमध्ये बंपर वैकेंसी काढली गेली आहे. जागा 972 पदांवर भरतीसाठी काढण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2021 आहे. जाणून घ्या याबद्दल महत्त्वाची माहिती- 
 
या विभागांमध्ये भरती होणार
जाहिरात मध्ये स्पष्ट केले गेले आहे की भरती अंतर्गत उत्तर प्रदेश पशुपालन विभाग, उत्तर प्रदेश आयुष विभाग, उत्तर प्रदेश चिकित्सा शिक्षा विभाग, चिकित्सा शिक्षा यूनानी आणि राजकीय जनविश्लेषक प्रयोगशाळा यात पद भरती होईल. 972 पैकी सवार्त अधिक 962 पद उत्तर प्रदेश आयुष विभागात भरले जाणार आहे.
 
या तारखा लक्षात ठेवा
भरती संबंधी जाहिरात अनुसार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2021 पासून सुरु होईल. इच्छुक उमेदवार 23 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. भरती संबंधित माहिती आयोगाच्या वेबसाइटवर बघितली जाऊ शकते. आयोगाने या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना निर्देश दिले आहेत की, ऑनलाइन अर्ज करताना त्यांनी नोंदणी, शुल्क भरणे, अंतिम जमा करणे इत्यादी सर्व चरणांच्या माहितीच्या सॉफ्ट आणि हार्ड कॉपी डाउनलोड करून ठेवाव्यात.
 
या प्रकारे करता येईल अर्ज
या भरतीसाठी, तुम्हाला प्रथम उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.uppsc.up.nic.in वर जावे लागेल. यानंतर, होम पेजवर, तुम्हाला अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड दिसेल. आता 4 क्रमांकावरील थेट जाहिरातीसह लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन टॅब उघडेल, आता त्या टॅबवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.
 
योग्यता
या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही भरतीशी संबंधित अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. त्याच वेळी, अर्जदारांचे वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.