शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:21 IST)

प्रदक्षिणा आरती

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली अम्हां आदिकरूनि काशी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
 
हातात फुले घ्यावीत व मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर ती देवाच्या पायावर वाहावीत.