शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (13:35 IST)

वट सावित्री पौर्णिमा : खास 6 उपाय

ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी करण्यासारखे 6 खास उपाय.
 
1. ज्या मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पित करावं आणि ओल्या मातीने टिळक करावं.
2. पितृ बाधा दूर करण्यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर वडाचे झाड लावा. 
3. केळीच्या झाडावर दररोज पाणी दिल्यास घरात आनंद नांदतो.
4. वट पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कच्चे सूत हळदीने रंगवावे आणि वडाच्या झाडाची तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. 
5. वट पौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पित केलं तर मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
6. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला हाता पंख्याने वारं द्यावं. यानंतर, त्याच पंख्याने घरी येऊन पतीला वारं घालावं. याने सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात.