रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (11:30 IST)

तुळशी विवाह सोहळ्याचे महत्व, गोदानापेक्षा अधिक पुण्य लाभतं

कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तसं तर वर्षभरच तुळशीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्यानं इच्छित फलप्राप्ती होते. कार्तिकच्या महिन्यात तुळशीची नियमानं पूजा केल्यानं आणि दररोज दिवा लावल्यानं भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. 

अशी आख्यायिका आहे की कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं त्याची फलप्राप्ती गऊदानाच्या फलप्राप्ती पेक्षा कित्येक पटीने अधिक होते.
 
कार्तिक महिन्यात शुक्लपक्षाच्या एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला तुळशीचे लग्न करतात. या दिवशी भगवान विष्णूं झोपेतून जागे होतात. म्हणूनच देव जागे झाल्यावरच तुळशीच्या लग्नाला पवित्र मुहूर्त मानतात. 
 
यंदाच्या वर्षी तुळशीचे लग्न गुरूवार 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. अशी आख्यायिका आहे की ज्या घरात तुळस असते अशा घरात यमदूत येत नाही. 
 
तुळशीचं लग्न शाळीग्राम सह झाले होते. म्हणून असे म्हणतात की जो कोणी भक्तीभावाने तुळशीची पूजा करतं, त्याला देवाचा आशीर्वाद मिळतो.
 
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी तुळसला वर दिले होते की मला शाळीग्रामाच्या नावानेच तुळससह पुजतील आणि जो कोणी तुळशीच्या शिवाय माझी पूजा करेल त्यांचा नैवेद्य मी स्वीकारणार नाही.
 
पूजा अशी करावी - 
शास्त्रानुसार, तुळशीच्या सभोवताली खांब उभारून त्याला तोरण बांधावे. खांब्यांवर स्वस्तिक चिन्हे काढावी. रांगोळीने अष्टदल कमळांसह शंख, चक्र, गोपद्म बनवून त्याची पूजा करावी. तुळशीचे आव्हान करून धूप, दिवा, रोली, शेंदूर, चंदन, नैवेद्य आणि कापडं अर्पण करावे. तुळशीच्या भोवती दिवे लावून दीपदान करून त्यांची विधियुक्त पूजा करावी.