हत्तीबद्दलचे 10 गुपित जे आपल्याला माहीत नाही जाणून घेऊया

Last Modified मंगळवार, 23 जून 2020 (14:28 IST)
पृथ्वीवर हत्ती सर्वात जास्त संवेदनशील प्राणी समजला जातो. हा माणसांपेक्षा देखील जास्त समजूतदार आणि बुद्धिमान प्राणी मानला गेला आहे. पण हत्तीपेक्षा अजून जास्त संवेदनशील आणि बुद्धिमान जलचर प्राणी डॉल्फिनला मानले गेले आहे. आज आपल्याला हत्तीचे 10 गुपित सांगणार आहोत.

1 अशी आख्यायिका आहे की पौराणिक मान्यतेनुसार हत्तींचा जन्म ऐरावत नावाच्या हत्तींपासून झालेला आहे. याचा अर्थ असा की ज्या प्रकारे माणसाचे पूर्वज स्वयंभू मनू आहेत त्याच प्रकारे हत्तींचा पूर्वज ऐरावत असे. ऐरावताची उत्पत्ती समुद्राच्या मंथनापासून झालेली होती, ज्याला देवराज इंद्राने आपल्याकडे ठेवून घेतले होते.

2
हत्तीला जगातील सर्व धर्मामध्ये पवित्र मानले गेले आहे. या प्राण्याचे संबंध विघ्नहर्ता गणपतीशी निगडित आहे. गणपतीचे तोंड हत्तीचे असल्यामुळे त्यांचे नाव गजतुंड, गजानन आहे. भारतामध्ये बऱ्याच देऊळाच्या बाहेर हत्तीची मूर्ती उभारतात. वास्तू आणि ज्योतिषाच्यानुसार भारतातील घरांमध्ये पितळ्याचा आणि लाकडाचे हत्ती ठेवण्याची प्रथा आहे.
3 हिंदू धर्मामध्ये अश्विन महिन्याचा पौर्णिमेला गजपूजा केली जाते. आनंद आणि समृद्धीच्या इच्छेने हत्तीची पूजा केली जाते. हत्तीची पूजा म्हणजे गणपतीची पूजा करणे. हत्तीला शुभ आणि लक्ष्मी देणारे मानले आहे.

4 पौराणिक कथेनुसार हत्तीने विष्णूची स्तुती केल्याचे वर्णन आढळतं. गजेंद्र मोक्ष कथेमध्ये याचे वर्णन केले आहे. गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय एका नदीकाठी एक मगर आपल्या जबड्यात पकडतो. त्यापासून सुटका होण्यासाठी त्याने विष्णूंची स्तुती केली असे. श्रीहरी विष्णूनी त्याला मगराच्या तावडीतून सुटका करून दिली होती.
5 गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुन हत्तींमध्ये मीच ऐरावत होय.

6 भारतामध्ये प्राचीन काळापासूनच राजा आपल्या सैन्यामध्ये हत्तींचा समावेश करत आले आहे. प्राचीन काळात राजांकडे हत्तींचे पण सैन्य असायचे जे विरोधी पक्षामध्ये शिरून त्यांना ठार मारायचे.

7 13 ऑक्टोबर 2010 रोजी भारतामध्ये झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (एनबीडब्लूएल) स्थायी समितीच्या बैठकीत हत्तींना राष्ट्रीय धरोहर घोषित करणाऱ्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या नंतर 15 ऑक्टोबर 2010 रोजी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.

8 हत्तींचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असतं. हत्तिणींमध्ये गर्भधारण काळ 18 ते 22 महिन्यापर्यंत असतं. दर मिनिटाला हत्ती 2 ते 3 वेळाच श्वासोच्छ्वास करतो. हत्ती असा एकमेव प्राणी आहे जो उड्या मारू शकत नाही पण बऱ्याच काळ पोहण्याची क्षमता ठेवतो. जेव्हा एखादी मुंगी हत्तीच्या सोंडेमध्ये शिरते तर त्यामुळे हत्ती मरण पावू शकतो. म्हणून हत्ती आपली पावलं हळुवार टाकत असतो.

9 हत्तीची वास घेण्याची शक्ती तीव्र असते. असे म्हणतात की एक हत्ती पाण्याच्या वासाला सुमारे 4 ते 5 किमीच्या अंतरावरून ओळखू शकतो. प्राण्यांमध्ये हत्तीचा मेंदू तीक्ष्ण असतो. हत्तीची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते. हे आपल्या साथीदाराची ओळख ठेवून त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला साठवून आणि आठवून ठेवतो. हत्ती कधीही आपापसात भांडत नाही. हे अपवादात्मक आहे. कळपातील एखाद्या हत्ती मरण पावल्यावर सर्वांना त्याचे दुःख होते.

10 हत्ती जगातील सर्वात भारदस्त प्राणी आहे एक इंच जाड त्वचा असलेल्या या प्राण्याचे वजन 10 हजार किलो पर्यंतचे असू शकते. हत्ती उभ्या उभ्याच झोपतात. तेही दिवसातून फक्त 4 तास. हत्तीच्या कानाच्या मागील भाग खूप मऊ असतो. म्हणून त्याला कानाद्वारेच नियंत्रित करतात. 5 कोट्यावधी वर्षांपूर्वी हत्तीच्या तब्बल 170 प्रजात्या सापडत होत्या पण आता फक्त 2 प्रजात्याचं शिल्लक आहेत. एलिफ्स (Elephas) आणि लॉक्सोडॉण्टा (Loxodonta).


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी
कधी कधी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चटपटीत खावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही वीकेंड स्पेशल ...

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी हे आसन करा

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी हे आसन करा
शरीर सरळ आणि स्थिर ठेवण्यासाठी मणक्याची विशेष भूमिका असते. वाकणे, चालणे यासह शरीराचा ...

NEET Preparation Tips: NEET परीक्षेच्या तयारीसाठी ...

NEET Preparation Tips:  NEET परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स
यंदा NEET UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. NEET परीक्षेद्वारे 607 वैद्यकीय, 313 ...

हवाई दलात अग्निशमन दलाची भरती सुरू, 5 जुलैपर्यंत नोंदणी

हवाई दलात अग्निशमन दलाची भरती सुरू, 5 जुलैपर्यंत नोंदणी
देशभरात सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर वायुसेनेने शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ...

Parenting Tips: मुलाच्या स्वभावात होणारा बदल या लक्षणांवरून ...

Parenting Tips: मुलाच्या स्वभावात होणारा बदल या लक्षणांवरून जाणून घ्या
प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मुलं हे त्यांचे विश्व आहे, आपल्या मुलांसाठी पालक काहीही ...