कसा असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव
तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते. ती तुमच्याकडून घेण्यासारखी असते. तुमच्या मनातील सुखदुःखाच्या भावना आणि हाती घेतलेले कार्य यामध्ये सतत संघर्ष सुरू असतो.इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत घाईगडबडीत तुम्ही कधीच काम करत नाहीत. तुम्ही सामर्थ्यशील असल्यामुळे कोणाच्या ताब्यात राहत नाही. तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या घराला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुमचा पहाडासारखा आधार असतो हे नक्की.
तुमची शारीरिक आणखी मानसिक शक्ती इतरांना लाजवेल अशी असते. कठीण प्रसंगात हार न मानणे. नाराज न होणे. हेच सद्गुण तुमचे आयुष्य तारायला संकटाना मारायला पुरेसे असते. म्हणूनच तुमच्या धाडसाचा इतरांना हेवा वाटतो.